कॅस्परस्की आणि किड्झेनियातर्फे भारतीय मुलांसाठी सायबरसुरक्षेचा प्रत्यक्ष अनुभव, मुंबईत सायबर इन्व्हेस्टिगेशन सेंटरचे उद्घाटन

मुंबई, 10 एप्रिल 2026 :
जागतिक स्तरावर कार्यरत सायबरसुरक्षा आणि डिजिटल प्रायव्हसीक्षेत्रातील कंपनी कॅस्परस्कीने आज घाटकोपर येथील आर सिटीमॉलमधील किड्झेनिया मुंबईमध्ये कॅस्पर्स्की सायबर इन्व्हेस्टिगेशनसेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. किड्झेनिया हे भारतातील सर्वात मोठेइनडोअर एड्युटेनमेंट थीम पार्क आहे.
सायबर इन्व्हेस्टिगेशन सेंटर हे या प्रकारातील पहिले रोल–प्ले केंद्र आहे, ज्यामध्ये 6 वर्षे व त्यापुढील वयोगटातील मुलांना प्रत्यक्ष सायबरसुरक्षामिशनच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत मुलांनाकॅस्परस्कीच्या प्रगत सुरक्षा साधनांचा वापर करून फिशिंग, आयडेंटिटीथेफ्ट आणि सायबरबुलिंग यांसारख्या प्रकरणांची तपासणी करण्याचाअनुभव देण्यात येतो, तसेच वाढत्या डिजिटल जगात सुरक्षित कसे राहावेयाचे प्रशिक्षण देण्यात येते.
आजची मुले डिजिटल जगात वाढणारी पिढी आहे. अतिशय लहानवयापासूनच त्यांचा तंत्रज्ञानाशी आणि त्याच्या फायद्यांशी संपर्क येतो. भारतात 14 वर्षांच्या वयापासून 82.2% मुलांना मोबाइल डिव्हाइसचाॲक्सेस आहे आणि ते या डिव्हाइसचा वापर व्हिडिओ पाहण्यासाठी, ऑनलाइन गेम खेळण्यासाठी, मित्र आणि कुटुंबीयांशी संपर्कातराहण्यासाठी तसेच शालेय कामांमध्ये मदत घेण्यासाठी करतात. डिजिटल जगात वाढणाऱ्या भारतीय मुलांना लहानपणापासूनचसायबरसुरक्षेबाबत जागरूक करणे त्यामुळे अत्यंत आवश्यक झाले आहे.
याच दृष्टिकोनातून कॅस्परस्की आणि किड्झेनिया यांच्यातील हीभागीदारी सादर करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांनासायबरसुरक्षेचे महत्त्व आणि जबाबदार डिजिटल नागरिकत्व याबाबतजागरूकता निर्माण करण्यामध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येते.
“खेळकर आणि समर्पक अनुभवाच्या माध्यमातून भारतातील मुले सायबरइन्व्हेस्टिगेटरची भूमिका पार पाडू शकतात. या प्रक्रियेत ते डिजिटलजगातील सर्वसाधारण धोके समजून घेतात आणि आपल्या डिजिटलआयुष्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वोत्तमसायबरसुरक्षा साधनांची ओळख करून घेतात. उद्याचे सायबर हिरो असेचअसतील,” असे कॅस्परस्की इंडिया येथील जनरल मॅनेजर जयदीप सिंगम्हणाले.
“कॅस्परस्कीमध्ये आमची धारणा आहे की, सायबरसुरक्षा ही केवळतंत्रज्ञानाची नव्हे, तर मानवी जबाबदारीचीही बाब आहे. मुलांना डिजिटलजगात सुरक्षितपणे वावरण्यासाठी आवश्यक असलेली जागरूकता आणिकौशल्ये जितक्या लवकर दिली जातील, तितके आपले सामुदायिकडिजिटल भविष्य अधिक सक्षम होईल. किड्झेनियासोबतची आमची हीभागीदारी सायबरसुरक्षा शिक्षण अधिक समर्पक, आकर्षक आणि खऱ्याअर्थाने आनंददायी करते. भारतात सायबर इन्व्हेस्टिगेशन सेंटर सुरूकरताना आम्हाला अभिमान वाटत आहे आणि डिजिटल सुरक्षेचे नवेसंरक्षक घडवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे ते पुढे म्हणाले.
“आपल्या मुलाला डिजिटल–फर्स्ट भविष्यासाठी कसे तयार करावे याचाआज प्रत्येक पालक विचार करत आहे. किड्झेनियामध्ये आम्ही या चिंतेचेरूपांतर अर्थपूर्ण अनुभवांमध्ये करतो. सायबरसुरक्षा क्षेत्रात जागतिकस्तरावर अग्रणी असलेल्या कॅस्परस्कीसोबत भागीदारी केल्यामुळे मुलांनाडिजिटल जगाची केवळ ओळख करून देणे नव्हे, तर त्यामध्ये सुरक्षितपणेआणि आत्मविश्वासाने वावरण्यासाठी सक्षम करणे शक्य होते,” असेकिड्झेनिया इंडियाचे सीबीओ श्री. तरणदीप सिंग सेखोन म्हणाले.
कॅस्परस्की सायबर इन्व्हेस्टिगेशन सेंटरमध्ये मुलांसाठी प्रत्यक्ष सहभागातूनशिकण्याचा अनुभव उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुलांनाकॅस्परस्कीचे युनिफॉर्म घालून मॉनिटर्स आणि कॅस्परस्कीच्या सुरक्षासॉफ्टवेअरने सुसज्ज अशा स्वतंत्र वर्कस्टेशन्सवर नियुक्त केले जाते. इंटरॅक्टिव्ह सिम्युलेशन्स आणि डिजिटल मिशन्सच्या माध्यमातून तेऑनलाइन धोके ओळखणे, सुरक्षित ब्राउझिंगचा सराव करणे आणिप्रत्यक्ष सायबरसुरक्षा परिस्थितींना प्रतिसाद देणे शिकतात. ही 20 मिनिटांची सत्रे एकावेळी 6 मुलांसाठी आयोजित केली जातात. हा उपक्रममजेदार आणि आकर्षक वातावरणात मुलांमध्ये चिकित्सक विचारसरणी, डिजिटल जागरूकता आणि जबाबदार ऑनलाइन वर्तन विकसितकरण्यासाठी तयार करण्यात आला आहे. तपास पूर्ण केल्यानंतर मुलांनाकिडझोस मिळतात.
किड्झेनिया मुंबई येथे झालेल्या भव्य उद्घाटन सोहळ्यात कॅस्परस्कीआणि किड्झेनिया इंडियाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माध्यम प्रतिनिधी आणिइन्फ्लुएन्सर्सच्या उपस्थितीत सेंटरचे उद्घाटन केले. कार्यक्रमकिड्झेनियाच्या वैशिष्ट्यपूर्ण शो फ्लोप्रमाणे पार पडला, ज्यामध्ये दिवाप्रज्वलन सोहळा, नृत्यसादरीकरण, की हस्तांतरण, किड्झेनियासिटीमधून भव्य परेड आणि शेवटी सायबर इन्व्हेस्टिगेशन सेंटरची रिबीनकापणे तसेच पाहुण्यांसाठी लाइव्ह रोल–प्ले अनुभव यांचा समावेश होता.
या भागीदारीचा एक भाग म्हणून किड्झेनियाचे तिकीट खरेदी करणाऱ्याअभ्यागतांना कॅस्परस्कीचे 2 महिन्यांचे विनामूल्य ट्रायल सबस्क्रिप्शनदेण्यात येईल, तर किड्झेनिया ॲन्युअल पासधारकांना विशेष ॲड–ऑनम्हणून कॅस्परस्कीच्या 1 वर्षाच्या सबस्क्रिप्शनचा लाभ मिळेल. याशिवाय, बाहेर पडताना कुटुंबांना कॅस्परस्कीचे डिस्काउंट व्हाउचर्स देण्यात येतीलआणि रोल–प्ले पूर्ण करणाऱ्या मुलांना वैयक्तिकृत कॅस्परस्की सायबरइन्व्हेस्टिगेटर कार्ड देण्यात येईल. हे चिन्ह म्हणजे त्यांच्या प्रमाणितसायबर डिफेंडर म्हणून मिळालेल्या यशाची नोंद असेल.
कॅस्परस्की विषयी
कॅस्परस्की ही 1997मध्ये स्थापन झालेली जागतिक सायबरसुरक्षा आणिडिजिटल प्रायव्हसी कंपनी आहे. कॅस्परस्कीने आजपर्यंत अब्जाहून अधिकडिव्हाइसेसना उदयोन्मुख सायबरधोके आणि लक्षित हल्ल्यांपासून संरक्षणदिले आहे. कॅस्परस्कीची सखोल थ्रेट इंटेलिजन्स आणि सुरक्षा क्षेत्रातीलकौशल्ये सतत नाविन्यपूर्ण उपाय आणि सेवांमध्ये रूपांतरित होत असूनजगभरातील व्यक्ती, व्यवसाय, महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि सरकारयांचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत आहेत. कंपनीच्या सर्वसमावेशकसुरक्षा पोर्टफोलिओमध्ये वैयक्तिक डिव्हाइसेससाठी अग्रगण्य डिजिटललाइफ प्रोटेक्शन, कंपन्यांसाठी विशेष सुरक्षा उत्पादने आणि सेवा, तसेचजटिल आणि सतत बदलणाऱ्या डिजिटल धोक्यांना तोंड देण्यासाठीसायबर इम्यून उपायांचा समावेश आहे. आम्ही लाखो व्यक्ती आणिजवळपास 200,000 कॉर्पोरेट ग्राहकांना त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्यागोष्टींचे संरक्षण करण्यास मदत करतो. अधिक माहितीसाठीwww.kaspersky.com ला भेट द्या.
किड्झेनिया इंडियाविषयी
किड्झेनिया हे एक इंटरॅक्टिव्ह फॅमिली एंटरटेनमेंट आणि शिक्षण केंद्रआहे, जे प्रत्यक्ष जीवनातील रोल–प्ले व्यवसायांच्या माध्यमातून मुलांनासक्षम बनवते, प्रेरित करते आणि शिक्षित करते. रस्ते, वाहने, इमारती, स्वतःची अर्थव्यवस्था आणि चलन (किडझोस) यांसह शहराप्रमाणेउभारलेले किड्झेनिया वास्तव आणि मनोरंजन यांचा संगम घडवून आणते. या माध्यमातून मुलांना करिअरची ओळख, पैशांचे व्यवस्थापन आणिजीवनकौशल्ये शिकण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करूनदेण्यात येते. अधिक माहितीसाठी www.KidZania.in ला भेट द्या.

