ट्रूसोल लाँच करत आहे ट्रूहर्ब्ज श्रेणी

मुंबई, ९ मार्च, २०२६: ट्रूसोल या बैद्यनाथ आयुर्वेद कंपनीच्या आधुनिक वेलनेस अँड पर्सनल केअर ब्रॅण्डने आज ट्रूहर्ब्ज श्रेणी बाजारात आणत असल्याची घोषणा केली. ट्रूसोल वेलनेस प्लॅटफॉर्अंतर्गत बाजारात आणली जाणारी ट्रूहर्ब्ज ही पारंपरिक आयुर्वेदिक वनस्पतींची विचारपूर्वक विकसित केलेली व अद्ययावत स्वरूपातील उत्पादने आहेत. आजच्या स्वास्थ्याबाबत जागरूक ग्राहकासाठी तयार करण्यात आलेल्या या उत्पादनश्रेणीत अश्वगंधा, गोक्षुर, ब्राह्मी आणि हदजोद अशी चार एक-वनस्पती (सिंगल हर्ब) मिश्रणे आहेत. अभिजात आयुर्वेदिक ज्ञानाची सांगड आधुनिक जीवनशैलीच्या आवश्यकतांशी घालणाऱ्या पर्यावरणपूरक, आधुनिक स्वरूपात ही उत्पादने आणली जात आहेत.
काळजीपूर्वक निवडलेल्या औषधी वनस्पतीजन्य घटकांवर, नियंत्रित वातावरणात त्यांचे नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतील अशा पद्धतीने, प्रक्रिया करून ट्रूहर्ब्ज श्रेणीचा विकास करण्यात आला आहे. मिश्रणांच्या आवश्यकतेनुसार या उत्पादनांमध्ये तीव्र, नियमित अर्क वापरण्यात आले आहेत. सक्रिय घटकांमध्ये एकसमानता राहील याची काळजी घेतानाच वनस्पतीचे नैसर्गिक गुणधर्मही टिकून राहतील याचीही काळजी घेण्यात आली आहे. शुद्धता, सुरक्षितता आणि उत्पादनांची विश्वासार्हता यांची काळजी घेण्यासाठी उत्पादनांची प्रत्येक बॅच कठोर दर्जा परीक्षणांमधून जाते. उत्तम उत्पादन पद्धतींचे (जीएमपी) पालन करणाऱ्या तसेच एफएसएसएआय आवश्यकतांसह सर्व लागू नियामक सूचनांचे काटेकोर पालन करणाऱ्या कारखान्यांमध्ये या श्रेणीचे उत्पादन करण्यात आले आहे.
ट्रूसोलचे सहसंस्थापक अधिराज शर्मा नवीन उत्पादनांबद्दल म्हणाले: “अश्वगंधा, ब्राह्मी, गोक्षुर आणि हाडजोड अनेक पिढ्यांपासून भारतीय कुटुंबांच्या दैनंदिन आरोग्याचा भाग आहेत. मात्र, कालांतराने जीवनशैली अधिक वेगवान आणि शहरी होत गेली आणि या वनस्पतींशी असणारा परिचय पुसट होत गेला. परंपरेची जागा सोयीने घेतली आणि केव्हा तरी आपण या औषधी वनस्पतींचा उपयोग थांबवला. ट्रूहर्ब्जच्या माध्यमातून आम्हाला या जुन्यापुराण्या वनस्पती पुन्हा दैनंदिन आयुष्यांमध्ये आणण्याची इच्छा होती. तसेच विनासायास, अस्सल, उपलब्ध होण्याजोग्या, आरोग्यपूर्ण व अधिक समतोल जीवनशैलीशी जुळणाऱ्या मार्गांनी नैसर्गिक स्वास्थ्याशी जोडून घेण्यात मदत करण्याचा उद्देश यामागे होता. ”


