फिलिपिन्सच्या दावाओ मेडिकल स्कूल फाउंडेशनमधून 1,015 भारतीय विद्यार्थ्यांनी प्राप्त केली डॉक्टरकीची पदवी.

मुंबई,10 मार्च 2026 : दावो सिटी येथे आयोजित दावाओ मेडिकल स्कूल फाउंडेशन इन्कच्या (डीएमएसएफ) 25व्या आंतरराष्ट्रीय मेडिकल डॉक्टर्स पदवीदान समारंभात भारतीय वंशाच्या तब्बल 1015 भारतीय विद्यार्थ्यांना डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) पदवी प्रदान करण्यात आली. परदेशातील एका वैद्यकीय शिक्षण संस्थेतून पदवी प्राप्त करणारा अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या पदवीधर गटांपैकी हा एक गट ठरला आहे.
दावाओ मेडिकल स्कूल फाउंडेशनकडून (डीएमएसएफ) देण्यात येणारी डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) पदवी भारतातील एमबीबीएस पदवीच्या समतुल्य मानली जाते. त्यामुळे परदेशातील वैद्यकीय शिक्षण संस्थेतून भारतीय विद्यार्थ्यांचा अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठ्या पदवीधर गटांपैकी एक ठरला आहे.
परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी गेल्या काही वर्षांत दावाओ मेडिकल स्कूल फाउंडेशनने एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या संस्थेतून आतापर्यंत जवळपास 12,000 भारतीय विद्यार्थी पदवीधर झाले असून त्यापैकी अनेक जण सध्या भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत.
या वर्षी पदवीधर होणारे विद्यार्थी भारताच्या विविध भागांतील आहेत. देशभरातून अनेक विद्यार्थी दावाओ मेडिकल स्कूल फाउंडेशनमध्ये (डीएमएसएफ) वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये या संस्थेबद्दलचे वाढते आकर्षण दिसून येते.
या प्रसंगी ट्रान्सवर्ल्ड एज्युकेअरचे सीईओ आणि फाउंडिंग चेअरमन डॉ. डेव्हिड पिल्लई म्हणाले, “हा पदवीदान समारंभ विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना पाठबळ देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेसाठी अभिमानाचा टप्पा आहे. मजबूत शैक्षणिक दर्जा, इंग्रजी माध्यमातून देण्यात येणारे शिक्षण आणि जागतिक स्तरावर मान्यता असलेले वैद्यकीय प्रशिक्षण यामुळे फिलिपिन्स हे भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी दीर्घकाळापासून विश्वासार्ह ठिकाण राहिले आहे.”


