स्ट्रायडर्स इम्पेक्स लिमिटेडचा आयपीओ २६ फेब्रुवारी २०२६ पासून खुला

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२६ – स्ट्रायडर्स इम्पेक्स लिमिटेड, खेळणी आणि मुलांच्या ग्राहक मर्चेंडाइज विभागातील एक उदयोन्मुख कंपनी, आपलाइनिशियल पब्लिक ऑफरिंग २६ फेब्रुवारी २०२६ रोजी खुला करणार आहे. कंपनीचा उद्देश ₹ ३६.२८ कोटी निधी उभारण्याचा असून, कंपनीचे शेअर्स एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होणार आहेत.
या निर्गमाचा एकूण आकार ५०,४०,००० इक्विटी शेअर्स इतका आहे, ज्यांचे दर्शनी मूल्य प्रति शेअर ₹ १० आहे. प्राइस बँड प्रति शेअर ₹ ७१ ते ₹ ७२ निश्चित करण्यात आला आहे.
इक्विटी शेअर वाटप:
• क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIB) – जास्तीत जास्त २३,९०,४००इक्विटी शेअर्स
• नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) – किमान ७,२०,००० इक्विटी शेअर्स
• इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स – किमान १६,७६,८०० इक्विटी शेअर्स
• मार्केट मेकर – जास्तीत जास्त २,५२,८०० इक्विटी शेअर्स
आयपीओमधून मिळणारा निव्वळ निधी मुख्य भूप्रदेश UAE मध्ये प्रस्तावितपूर्ण मालकीच्या उपकंपनीची स्थापना व गुंतवणूक, कर्ज परतफेड, कार्यकारीभांडवलाच्या गरजा आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्यातयेणार आहे. अँकर गुंतवणूकदारांचा भाग मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२६ रोजीखुला होईल आणि सोमवार, २ मार्च २०२६ रोजी बंद होईल.
या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर कॅपिटल स्क्वेअर अॅडव्हायझर्स प्रायव्हेटलिमिटेड असून, रजिस्ट्रार लिंक एमयूएफजी इंटाइम इंडिया प्रायव्हेटलिमिटेड आहेत.
स्ट्रायडर्स इम्पेक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुमारश्री राजकुमार बहेती आणि श्री. मुस्तफा इस्माईल कपासी म्हणाले,“ स्ट्रायडर्सइम्पेक्स लिमिटेड मध्ये आमचा प्रवास खेळणी आणि मुलांच्या ग्राहक वस्तूक्षेत्रात वेगळेपण निर्माण करण्याच्या स्पष्ट दृष्टीकोनातून सुरू झाला. आमचेपहिले परवाना–आधारित उत्पादन लाँच केल्यानंतर आम्ही सातत्याने आमचापोर्टफोलिओ विस्तारला, तसेच डिझ्नी, हॅमलेस, मिनिसो आणि लँडमार्क ग्रुपयांसारख्या आघाडीच्या ब्रँड्ससोबत धोरणात्मक भागीदारी केली आणिभारत व संयुक्त अरब अमिरातमध्ये मजबूत वितरण जाळे उभारले.
आज आम्ही अॅसेट–लाईट मॉडेलद्वारे कार्यरत आहोत, ज्यात जागतिकपरवानाधारक ब्रँड्स आणि आमच्या स्वतःच्या वाढत्या मालकीच्या ब्रँड्सचासमन्वय आहे. याला अखिल भारतीय ओम्नीचॅनेल नेटवर्क आणि वाढत्याआंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मचे बळ मिळाले आहे.
प्रस्तावित आयपीओ आमच्या वाढीच्या प्रवासातील पुढील टप्पा दर्शवतो. यानिधीद्वारे आम्ही वितरण अधिक मजबूत करू, ब्रँड उभारणीत गुंतवणूक करू, कार्यकारी भांडवल सुदृढ करू आणि आमच्या UAE प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनआंतरराष्ट्रीय विस्ताराला गती देऊ—ज्यामुळे शाश्वत आणि दीर्घकालीनमूल्यनिर्मिती साध्य होईल.”
कॅपिटलस्क्वेअर अॅडव्हायझर्सचे संचालक,डॉ.सुनील कुमार मनोचा म्हणाले,स्ट्रायडर्स इम्पेक्स लिमिटेड च्या वाढीच्या प्रवासातील या महत्त्वाच्याटप्प्यावर आम्ही त्यांच्यासोबत भागीदारी करत आहोत याचा आम्हाला आनंदआहे. अल्पावधीतच कंपनीने खेळणी आणि मुलांच्या वस्तू क्षेत्रात प्रभावीउपस्थिती निर्माण केली आहे. स्केलेबल अॅसेट–लाईट मॉडेल, मजबूतपरवाना भागीदारी आणि सातत्याने वाढणारा स्वतःच्या ब्रँड्सचा पोर्टफोलिओही त्यामागची प्रमुख कारणे आहेत.
आघाडीच्या जागतिक आणि रिटेल भागीदारांशी दृढ संबंध आणि संयुक्तअरब अमिरातीतील आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मच्या बळावर कंपनी पुढील वाढीच्यासंधी साधण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या सक्षम आहे. आगामी आयपीओमध्येस्ट्रायडर्स इम्पेक्स लिमिटेड ला पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतोआणि त्यांच्या दीर्घकालीन, शाश्वत वाढीच्या दृष्टीकोनावर आम्हाला पूर्णविश्वास आहे.”
स्ट्रायडर्स इम्पेक्स लिमिटेडबद्दल:
स्ट्रायडर्स इम्पेक्स लिमिटेड ही ग्राहक उत्पादने क्षेत्रातील कंपनी असून तीखेळणी आणि मुलांच्या ग्राहक वस्तूंच्या परवाना (लायसेंसिंग), विकास, सोर्सिंग आणि वितरण व्यवसायात कार्यरत आहे. कंपनी आपला नवीनप्रारंभिक समभाग विक्री (IPO) सादर करत आहे.
कंपनी अॅसेट–लाईट आणि स्केलेबल व्यवसाय मॉडेलवर कार्य करते, ज्यामध्ये उत्पादन डिझाइन, विकास, सोर्सिंग, उत्पादन समन्वय आणिवितरणापर्यंत सर्वसमावेशक (एंड–टू–एंड) उपाय प्रदान केले जातात.कंपनीनेआधुनिक व्यापार, सामान्य व्यापार आणि ई–कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे अखिलभारतीय वितरण जाळे उभारले असून, शहरी तसेच अर्ध–शहरी बाजारपेठांमध्येमजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. देशांतर्गत व्यवसायाबरोबरच, कंपनीचीसंयुक्त अरब अमिरातीमध्ये पूर्ण मालकीची उपकंपनी असून, ती परदेशातीलवितरण आणि व्यापार कार्यांना पाठबळ देते.
आर्थिक वर्ष २०२४-२५ (FY२५) मध्ये कंपनीने एकत्रित महसूल ₹६,१८६.५१ लाख, EBITDA ₹९३२.१७ लाख आणि करानंतर नफा (PAT) ₹८४०.७४ लाख नोंदवला.
डिसेंबर २०२५ अखेरच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने एकत्रित महसूल ₹४,९५६.९९ लाख, EBITDA ₹६४९.०३ लाख आणि करानंतर नफा (PAT) ₹४०१.०५ लाख साध्य केला.
अस्वीकरण:
या दस्तऐवजात नमूद केलेली काही विधाने ऐतिहासिक तथ्यांवर आधारितनसून ती भविष्यकालीन अंदाज आहेत. अशा विधानांवर विविध जोखमी आणिअनिश्चितता परिणाम करू शकतात, जसे की शासकीय धोरणे, स्थानिक, राजकीय किंवा आर्थिक घडामोडी, तांत्रिक जोखीम आणि इतर अनेक घटक, ज्यामुळे प्रत्यक्ष निकाल या अंदाजांपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळे असू शकतात. अशा विधानांवर आधारित कोणतीही कृती केल्यास कंपनी त्याबाबतजबाबदार राहणार नाही आणि पुढील घटना किंवा परिस्थितीनुसार याभविष्यकालीन विधानांचे सार्वजनिक अद्यतन करण्याची कंपनीवर कोणतीहीजबाबदारी राहणार नाही.


