Breaking NewsGeneralPublic Interest

NODWIN Gaming कडून ‘मुंबई कॉमिक कॉन २०२६’ ची घोषणा:

​मुंबई, २३ फेब्रुवारी, २०२६: कॉमिक कॉन इंडियाचा विविध शहरांतील पॉप कल्चरचा उत्साहपूर्ण सोहळा आता देशाच्या आर्थिक राजधानीत होणार आहे. ‘मारुती सुझुकी एरिना’ प्रस्तुत आणि ‘क्रंचीरोल’ (Crunchyroll) समर्थित ‘मुंबई कॉमिक कॉन’ येत्या ९ आणि १० मे रोजी बीकेसी (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करताना ‘NODWIN Gaming’ ला अभिमान वाटत आहे. हा विकेंड कल्पनाशक्ती, कथाकथन, कॉस्प्ले आणि पॉप कल्चरप्रती असलेल्या प्रेमासाठी चाहत्यांना आणि निर्मात्यांना एकत्र आणणारा ठरेल.
​कॉमिक कॉन इंडिया हे देशातील सर्वात प्रिय पॉप कल्चर प्लॅटफॉर्म म्हणून विकसित होत आहे – जिथे सर्जनशीलता बहरते आणि चाहत्यांच्या आवडीला हक्काची जागा मिळते. मुंबई कॉमिक कॉनच्या २०२५ च्या आवृत्तीत शहराचा खास उत्साह पाहायला मिळाला होता, ज्यामध्ये हजारो चाहत्यांनी कॉमिक्स, ॲनिमे, गेमिंग, कॉस्प्ले आणि कलेक्टिबल्सचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावली होती.
​गेल्या वर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रसिद्ध जपानी व्हॉईस आर्टिस्ट कप्पेई यामागुची आणि हिरोकी हिराता यांची उपस्थिती, ज्यांनी ‘वन पीस’ (One Piece) मधील ‘उसोप’ आणि ‘सांजी’ या पात्रांना आवाज दिला आहे. त्यांच्या उपस्थितीने चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला होता. याच धर्तीवर, मुंबई कॉमिक कॉन २०२६ मध्ये एका विशेष पॅनेलद्वारे विविध लोकप्रिय कलाकार आपला व्यावसायिक प्रवास आणि सर्जनशील प्रक्रिया चाहत्यांसमोर मांडणार आहेत.
​अक्षत राठी (सह-संस्थापक आणि एमडी, NODWIN Gaming) म्हणाले, “मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते, पण तेवढेच ते संधींचे शहर देखील आहे. हाच उत्साह कॉमिक कॉनमध्ये पाहायला मिळतो. शहराच्या वेगवान जीवनातही चाहते कॉस्प्ले करून येतात, कलाकार इथल्या रस्त्यांवरील प्रभाव त्यांच्या कलेत आणतात. इथली व्याप्ती आणि सर्जनशील ठिणगी खऱ्या अर्थाने ‘आमची मुंबई’ असल्यासारखी वाटते. शहराची ऊर्जा आणि कथांवरील प्रेम साजरे करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा परतत आहोत.”
​शेफाली जॉन्सन (सीईओ, कॉमिक कॉन इंडिया) म्हणाल्या, “नव्याने बांधलेल्या मुंबई कोस्टल रोडच्या प्रोमेनेडवर संध्याकाळी फिरताना एक वेगळीच भावना असते. मुंबई कॉमिक कॉनमध्येही तीच ऊब आणि मोकळेपणा जाणवतो. समर्पित कॉस्प्लेअर्सपासून ते पहिल्यांदा येणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत, येथे समुदायांचे एकत्र येणे अत्यंत सहज आणि आनंददायी असते. या मे महिन्यात पुन्हा एकदा या स्वप्नांच्या शहरात अविस्मरणीय सोहळा साजरा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
​मुंबई कॉमिक कॉनने ऐतिहासिकदृष्ट्या भारतातील विकसित होत असलेल्या गेमिंग संस्कृतीवरही प्रकाश टाकला आहे. उदयोन्मुख डेव्हलपर्स आणि स्वतंत्र निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन नवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम कॉमिक कॉन सातत्याने करत आहे.
​या सोहळ्यात उपस्थितांना कॉमिक्सची मोठी श्रेणी पाहता येईल, ॲनिमे आणि मांगा मधील नवीन गोष्टी जाणून घेता येतील, तसेच भारतीय आणि आंतरराष्ट्रीय निर्मात्यांना भेटता येईल. याव्यतिरिक्त, येथे मोठे गेमिंग झोन, पॅनेल चर्चा, लाइव्ह परफॉर्मन्स, कॉमेडी शो आणि संगीत कार्यक्रम देखील असतील.
​९-१० मे २०२६ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे होणाऱ्या मुंबई कॉमिक कॉनची तिकीटं केवळ झोमॅटोच्या District ॲपवर उपलब्ध असतील.
​तिकीट उपलब्ध: https://link.district.in/DSTRKT/hvgzsgq9
​वेबसाइट: www.comicconindia.com.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!