Breaking NewsGeneralPublic Interest

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित युवाची ए4 लाँगबुक्स आणि मराठी ‘सुविचार’ पेन्सिली महाराष्ट्रभरातील दुकानांत उपलब्ध

महाराष्ट्र, १९ फेब्रुवारी २०२६ :

महाराष्ट्रभरात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्टेशनरी ब्रँड युवातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शालेय साहित्याची विशेष मालिका सादर करण्यात आली आहे. सतराव्या शतकातील मराठा राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्मृतीत अत्यंत महत्त्वाचे असून, या उत्पादनांच्या माध्यमातून परिचित ऐतिहासिक संदर्भ थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतात.

शाळांमधील विविध वयोगटांच्या गरजा लक्षात घेऊन ही श्रेणी साकारण्यात आली आहे. मोठ्या आकाराची ए4 लाँगबुक्स माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत, तर पेन्सिली सर्वचवयोगटातील विद्यार्थ्यांच्या वापरासाठी अनुकूल आहेत.

या सर्व ए4 लाँगबुक्सवर छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंग आणि प्रतीकांचे चित्रात्मक सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच या पेन्सिलींवर छोटे मराठी सुविचारही देण्यात आले आहेत, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचे वर्णन करणारे सुविचारही समाविष्ट आहेत.

दैनंदिन शालेय साहित्यामध्ये प्रादेशिक आणि सांस्कृतिक संदर्भ समाविष्ट करण्याच वाढता ट्रेंड या उपक्रमातून दिसून येतो. समाज माध्यमांचा प्रभाव अधिकाधिक जागतिक स्वरूपाचा होत असताना, विद्यार्थ्यांच्या रोजच्या आयुष्यात सांस्कृतिक ओळख जपली जावी, यासाठी शिक्षक आणि पालकांकडून अशा उपक्रमांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

युवा स्टेशनरीचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणाले की, आधुनिक विचारसरणी आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा संगम साधण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यार्थी दररोज या वस्तूंचा वापर करतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नेतृत्वाशी जोडलेल्या शिस्त, धैर्य यांसारख्या गुणांचीत्यांना सतत आठवण करून देण्याचे काम या वस्तू करू शकतात,” असे ते म्हणाले.

विक्रेत्यांच्या मते, अशा संकल्पनांवर आधारित उत्पादनांना सहसा जयंतीदिनी किंवा विशेष प्रसंगांच्या काळात अधिक मागणी असते. मात्र, विद्यार्थ्यांना ती आवडल्यास संपूर्ण शैक्षणिक वर्षात त्यांची विक्री सुरू राहते. नवीन शैक्षणिक सत्र जवळ येत असल्याने, ही उत्पादने बॅक-टू-स्कूलखरेदीचा भाग ठरण्याचीही शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!