देशमहाराष्ट्र

पेण तालुक्यात पहिल्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन; ‘कृषी तरंग २०२६’चा उत्साहात शुभारंभ

पेण, प्रतिनिधी –पेण तालुक्यात वनराई व जेएसडब्लू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कृषी तरंग २०२६’ या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी, ८ जानेवारी २०२६ रोजी Sissom Riverside, पेन बायपास येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

*या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्री. सत्यजित बडे (आयएएस), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,* रायगड जिल्हा परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी वनराईचे विश्वस्त श्री. सागर धारिया, वनराईचे सचिव श्री. अमित वाडेकर, जेएसडब्लू स्टील (डोलवी) चे उपाध्यक्ष– Land & Estate श्री. आत्माराम बेटकेकर, जेएसडब्लू फाउंडेशन चे सामाजिक दायित्व प्रमुख श्री. सुधीर तैलोंग, जेएसडब्लू फाउंडेशनच्या Water, Environment and Sanitation विभागाच्या प्रमुख श्रीमती रूपा दावणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हे कृषी प्रदर्शन ८ व ९ जानेवारी २०२६ या दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, मत्स्यशेती, दुग्धव्यवसाय आदी विषयांवर विविध कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारे, खते व औषधे, महिला बचत गटांचे व्यवसाय, विविध शासकीय विभाग व त्यांच्या योजनांचे प्रदर्शनही या ठिकाणी मांडण्यात आले आहे.

या कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळून शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होईल, असा विश्वास आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!